Type Here to Get Search Results !

बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद- भावजयच्या लढतीमध्ये नणंदने बाजी मारली...सुप्रियाताई सुळे यांना १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजयी मिळवला... चौथ्यांदा खासदारकीचा मान.

बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद- भावजयच्या  लढतीमध्ये नणंदने बाजी मारली.
सुप्रियाताई सुळे यांना १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजयी मिळवला.... चौथ्यांदा खासदारकीचा मान.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी:-अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामतीमधील ही लढत पवार कुट्ंबासाठी जेवढी प्रतिष्टची होती तेवडीच राजकीय हृट्या ती महत्वाची होती. त्यामुळे अख्ख पवारकुटुंब प्रचारात उतरलं होतं. कोणी नंनदेच्या पाठीशी उभ होतं तर कोणी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत होते. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी लढत पाहिला मिळाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून चौथ्यांदा खासदारकीचा मान पटकावलाय.
ही लढत भावनिक झाली होती. मागील तीन टर्म लेकीला निवडून दिले. आता सुनेकडे नेतृत्व आले की फिट्टमफाट होईल, असाटोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला होता. त्या टीकाउत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकालनुसार बारामती ही शरद पवारांचीच आहे हे पुन्हा एकदा सिंद्ध झालं. ६ वेळा शरद पवार खासदार आणि आता लेक सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत,

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ेची लढाई बारामती मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसलाय, बारामतीत पवार विरुद्धर पवार अशा या सामनाकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या. शरद पवारयांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडून सुनेत्रा पवार या एकमेकांसोबत उभ्या होत्या. 

नणंद- भावजयच्या या लढतीमध्ये नणंदने बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे १ लाख ५३ हजार ०४८ मतांनी विजयी मिळवलाय,

नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांशसामान्य बारामतीकर शरद पवार साहेबां सोबत इमोशनलीकनेक्टेड आहे ...असे असताना दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.व  त्यापद्धतीने प्रचारही केला.

कोणत्या विधानसभामतदारसंघात किती मतदान?
२०२४
एकूण मतदान -५९.५०  टक्के

दौंड - ६०.२९  टक्के

इदापूर -६७.१२  टक्के

बारामती - ६९.४८ टक्के

पुरंदर- ५४.९६ टक्के

भोर - ६९.११ टक्के

खड़कवासला - ५१.५५ टक्के


अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा धुळीला...

अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे.आगामी काळात होणाया विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायतसमिती, नगरपालिका, नगरपंचायत ,जिल्हा मध्यवर्ती ,ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांना इथे मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test