श्री सोमेश्वर मंदिर येथे खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-महासंसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा रविवारी ३० जुन रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त सकाळी श्री सोमेश्वर मंदिर करंजे (ता बारामती) येथे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महारुद्र अभिषेक तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व दीर्घयुष आरोग्य चांगले मिळावे म्हणून प्रार्थन केली व केक कापून सर्व बारामतीच्या पश्चिम भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते उद्योजक राजेंद्र बाप्पू जगताप, प्रदीप शेंडकर, प्रियांकाताई शेंडकर, सागर मदने, सुयश सोरटे, राजूआण्णा लकडे, निलेश गायकवाड, चारुहास शिंदे, हनुमंत मगर, राजेंद्रभाऊ गायकवाड, सुधीर गायकवाड, विनोद गायकवाड,संभाजी होळकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.