Type Here to Get Search Results !

मतदारांना नेमकं कुठे बटन दाबायच कळाले आणि अधिकचे मतदानाने सुप्रिया सुळे निवडून आल्या - शरद पवार

मतदारांना नेमकं कुठे बटन दाबायच कळाले आणि अधिकचे मतदानाने सुप्रिया सुळे निवडून आल्या - शरद पवार 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- 
जसा शेतकरी राजा असतो तसाच मतदारही राजा असतो ....नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात दीड लाख मताधिक्याने निवडून दिल्याने हे सिद्ध झाले व  मतदारांनी  नेमकं बटन कुठलं दाबायचं हे सामान्य नागरिकांनी मतदानाला जाताना निश्चित केल्याने हा विजय झाला असल्याने सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांचे  आभार मानले ..
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज मंगळवार  रोजी दौरा आयोजित नागरिकांसाठी जनसंवाद सादला तर बारामतीच्या पश्चिम भागात करंजेपुल येथे त्यांनी झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्या प्रसंगी बोलताना मानले.... यापुढेही असेच प्रेम सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांनी दाखवावे यासाठीच मी तुमचे आभार मानत आहे तसेच सहकार,जिल्हापरिषद, पंचायत समिती ,नगरपालिका तसेच विविध संस्था यामध्ये राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटामार्फत निवडणूक लढणार असून आपल्या विचारांचे सदस्य यापुढे नेमले जातील.... हुकूमशाही ला आळा घालण्याची जबाबदारी माझी असेल असेही त्यांनी बोलताना सांगितले या प्रसंगी व्यासपीठावर पवार कुटुंबातीलच त्यांची नातू युवा नेते   युगेंद्रदादा पवार ,जेष्ठ  नेते सतिशमामा खोमणे, ,जिल्हा अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे , बारामती तालुका अध्यक्ष अँड.एस एन जगताप, बी एम गायकवाड, अँड.तानाजी गायकवाड  व व्यापार व औद्योगिक सेल तालुकाध्यक्ष राजेंद्रबापू जगताप सह राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक मध्ये राजेंद्रबापू जगताप यांनी अनेक शेतकऱ्यांचे तसेच कारखानदारी संदर्भातील काही प्रश्न पवार साहेब समोर मांडत भरगोस मताधिक्य दिल्या बद्दल पक्षाच्या वतीने ऋण व्यक्त केले तसेच  मनोगतमध्ये  बारामती तालुका युवती अध्यक्षा प्रियंका राहुल शेंडकर यांनी मी शरद पवार साहेबांसोबत आहे याचा  मला सार्थ अभिमान असल्याचे सांगत पुढील काळातही आम्ही सोमेश्वर भागातून सर्व महिला नागरिक तुमच्या सोबतच राहू असे सांगत हजारोंच्या संख्येत उपस्थित असणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.
आयोजित शेतकरी संवाद मेळाव्याप्रसंगी सोमेश्वर पंचक्रोशीतील मुरूम, वाणेवाडी ,वाघळवाडी, करंजे करंजेपूल ,मगरवाडी ,वाकी, चोपडज, चौधरवाडी व आलेल्या आसपासच्या इतरही गावांमधील जेष्ठ नागरिकांनी शरद पवारसाहेब यांचा  हार श्रीपल शाल पुष्पगुच्छ देत सत्कार केला व तुमच्या सोबत आम्ही कायम आहोत असेही सत्कार प्रसंगी नागरिकांनी ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test