Type Here to Get Search Results !

आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन तरुणांनी करिअर घडवावे- मंत्री मंगल प्रभात लोढा

आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊन तरुणांनी करिअर घडवावे- मंत्री मंगल प्रभात लोढा
पुणे - आयटीआयमध्ये विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेऊनही तरुण पिढीला जर्मनी, जपान सारख्या देशात जाण्याची संधी मिळू शकते. अशा संधींचा लाभ घेऊन करिअर घडवावे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन दुरदृष्य प्रणालीद्वारे श्री. लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, औंध आयटीआयचे उपसंचालक तथा पुणे विभागाचे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक आर. बी. भावसार, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या श्रुती जोशी आदी उपस्थित होते.

श्री. दळवी यांनी आयटीआय तसेच तेथील योजनांविषयी माहिती दिली. आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना येत्या काही दिवसांमध्ये दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जपान आणि जर्मनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून त्यासाठी या भाषा शिकणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये मुंबई विभागामध्ये या भाषा शिकविल्या जात असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघात हे करिअर शिबिर २२ जूनपर्यंत आयोजित करण्यात येत असून हा पुण्यातील कार्यक्रम हा राज्यातील पहिला कार्यक्रम आहे, असे श्री.भावसार यांनी प्रास्ताविकात नमूद केले.

शिवाजीनगर विधानसभा सदस्य आमदार माननीय श्री.सिद्धार्थ शिरोळे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
दीप फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी करियर निवडताना येणारे अडथळे, माहितीचा अभाव हे दूर करण्यासाठी व परिस्थिती कोणतीही असताना त्याचा बाऊ न करता आपल्या आवडीचे करिअर विचारपूर्वक निवडावे व निवडल्यानंतर ते योग्य पद्धतीने तडीस न्यावे यासाठी संघर्ष, संयम व सातत्य या तिन्ही गुणांचा संगम निर्माण करावा, असे नमूद केले. 

दहावी, बारावी व आयटीआय नंतर तंत्रनिकेतनमध्ये कोणकोणते पदविका अभ्यासक्रम करता येऊ शकतात व त्याला लागणारा कालावधी, कागदपत्र आणि तंत्रनिकेतनची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली.

श्रुती जोशी यांनी कौशल्य विद्यापीठाकडील योजना व अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. 

 यावेळी जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्राचार्य, औंध आयटीआयचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test