Type Here to Get Search Results !

लवकरच उर्वरित सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे ची कामे व सुशोभीकरण पूर्ण होणार - पुरुषोत्तम जगताप

लवकरच उर्वरित सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे ची कामे व सुशोभीकरण पूर्ण होणार - पुरुषोत्तम जगताप
 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- 
बारामती तालुक्यातील करंजे येथील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा मध्ये श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, कंपास, पेन, वह्या, स्टीपींन बॅग, पाणी बाॅटल आदी शालेय साहित्य सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सीईटी परीक्षेत पास झालेला समर्थ शिंदे व एमपीएससी परीक्षेत पास झालेले निखिल थिटे यांचाही  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, उद्योजक संतोष कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सुखदेव शिंदे यांनी आपल्या संस्थेच्या वतीने रक्तदान, नेत्र शिबीर, मोफत चष्मेवाटप, तसेच सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना चेअरमन जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून खासबाब म्हणून ही कारखान्यातर्फे भाग शाळा सुरू करण्यात आली. करंजे गावातील विद्यार्थ्यांना जवळच शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ही शाळा सुरू झाली. या शाळेचे क्रीडांगण तसेच शाळेला रंगरंगोटी  परिसरात सुशोभिकरणासाठी  चांगल्या प्रतीची झाडे व इतर गरजेनुसार विविध विकास कामे  करून देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतल्याची माहिती यावेळी बोलताना जगताप यांनी दिली.

आयोजित कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रविण कांबळे,ऋषिकेश गायकवाड, श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे, उद्योजक संतोष कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, करंजेचे सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच मयुरी गायकवाड,सदस्य विष्णू दगडे, अशोक होळकर, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगरचे प्राचार्य पी. बी.जगताप,चौधरवाडीचे सरपंच शशांक पवार, भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे, संताजी गायकवाड,वैभव गायकवाड, सुधीर गायकवाड, भरत हगवणे, तानाजीराव भापकर, राकेश गायकवाड, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य आर. बी. नलवडे, सूत्रसंचालन व्ही. एल. पाटोळे, यांनी तर आभार एच. एम. गाडेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test