प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्था वतीने गरजू विद्यार्थ्यांला 'एक हात मदतीचा' .
सोमेश्वरनगर -प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सभासद संदिप गायकवाड यांच्या निदर्शनास आलेल्या गरिब विद्यार्थ्यांला शाळेचा गणवेश तसेच शालेय साहीत्याचे वाटप करण्याचा निर्णय प्रगती बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाघळवाडी या संस्थेने घेतला संस्थेच्या अध्यक्षा सुचिता जगन्नाथ साळवे यांंनी न्यु इग्लिश स्कुल पांढरवस्ती,वाकी(ता.बारामती) या शाळेचे प्राचार्य. इनामदार सर याच्याशी संपर्क साथून सदर विद्यर्थी कु. किशोर माने याच्या परिस्थितीचा आडवा घेत गरजू विद्यार्थी किशोर माने याला शाळेचा गणवेश तसेच शालेय साहीत्याचे वाटप प्रगती बहुउद्देशीयसामाजिक संस्थेच्या आध्यक्षा सुचिता साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्राचार्य .इनामदार शब्बीर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहीती दिली. तसेच.सुचिता साळवे यांनी मनोगत व्यक्त केले.ग्रामिण भागातील सुंदर शाळा पाहून समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली शाळेतील सर्वच शिक्षक तळमळीने चांगले विद्यार्थी घडवत आहेत व विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत याच सार्थ अभिमान वाटतो आसे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.तसेच आमची संस्था या शाळेसाठी वेळोवेळी मदत.करेल असे सांगितले या प्रसंगी शाळेतील शिक्षक देवीदास जगदाळे सर, विनोद ननावरे, आप्पासाहेब भापकर , पुष्पलता जगताप व इतर शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ गणेश पवार उपस्थित होते.