बारामती कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्या करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
बारामती - वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातील शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडगाव निंबाळकर येथे शेतकरी मार्गदर्शन सत्र चालू आहे. वडगाव निंबाळकर गाव परिसरातील शेतकरी बांधवांना या कृषी कन्या ठिकठिकाणी जाऊन योग्य सल्ले व मार्गदर्शन करत आहेत. ज्ञानेश्वरी खळदकर,नेहा पडवळ, गायत्री बल्ले, दिशा मोरे, आदिती माने,साक्षी कोते व नेहा पाटील या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यकर्म 2024- 25 अंतर्गत सात आठवडे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी कृषी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य व सुख सुविधांनी परिपूर्ण असलेल्या वडगाव निंबाळकर या गावची निवड केली आहे.
(वडगाव निंबाळकर गाव शेती व्यवसायात अग्रेसर आहे, विविध फळे, फुले,भाजीपाला इतर सर्व पिके जोमात असतात.तसेच विविध संशोधन प्रक्रिया केली गेली बि.बियाणे, रोपे यांची लागवड केली जाते. तसेच सेंद्रिय शेती आधुनिक शेती प्रणालीचा वापर वडगाव निंबाळकर गावचे शेतकरी बांधव करीत आहेत. - सुनील ढोले सरपंच वडगाव निंबाळकर )
कृषिकन्या ठिकठिकाणी जाऊन कार्यशाळा आयोजन करून शेतकरी बांधवांना माहिती देत आहेत व नवीन नवीन माहिती आत्मसात करत आहेत. या विद्यार्थिनी म्हणजे उद्याचे भविष्य आहे या कृषी कन्या म्हणून ओळखले जाणार आहेत. यावेळी वडगाव गावचे सरपंच सुनील ढोले,उपसरपंच संगीता शहा,जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. या कृषी कन्या कार्यशाळा सत्रामध्ये महाविद्यालयाच्या प्रा. जया तिवारी कार्यक्रम समन्वयक प्रा. निळकंठ जंजिरे कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी देवकाते व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन या कार्यशाळा सत्रामध्ये होत आहे.