सोमेश्वरनगर :- बारामती सराफ असोसिएशन च्या अध्यक्षपदी सोमेश्वरनगर येथील किरण आळंदीकर यांची काल चौथ्या वेळेस बिनविरोध निवड झाली.यावेळी इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष बागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपला 3 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने किरण आळंदीकर यांनी राजीनामा दिला होता, बारामती येथील हॉटेल कृष्णसागर येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत आळंदीकर यांनी नवीन अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीबाबत सभासदांनी निर्णय घ्यावा असे सांगितले, यावर सभासदांनी एकमताने पुन्हा किरण आळंदीकर यांना च अध्यक्षपदी निवडण्याचा निर्णय घेतला.
बारामती सराफ असोसिएशन मध्ये बारामती सह दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण,कोरेगाव,माळशिरस, भोर तालुक्यातील सभासद आहेत.
सराफ असोसिएशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, आत्तापर्यंत भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, आपत्तीग्रसतांसह अनाथ, अपंग, गरीब विध्यार्थी, खेळाडू, दृष्टीहीन तसेच समाजातील उपेक्षितांना वेळोवेळी मदत केली असल्याचे हि आळंदीकर यांनी सांगितले.
राज्यातील पहिले तालुका पातळीवरील सभासदांच्या मालकीचे भव्य ऑफिस बारामती मध्ये केले असून लवकर च राज्यातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत याचा उदघाटन सोहळा होणार आहे.
आळंदीकर यांनी आपल्या कालावधीत संघटना बांधणी करून,सराफ व्यवसायिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय पातळीवरील इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी हि निवड झाली असून पश्चिम महाराष्ट्रात हि मोठ्या प्रमाणात संघटना बांधणी केली आहे..
पुढीलप्रमाणे असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष - सुधीर पोतदार, उपाध्यक्ष - किशोर शहा, सराफ, सचिव - ए. बी. होनमाने, खजिनदार - गणेश बनछोड, कायदेशीर सल्लागार - अँड.गणेश आळंदीकर सल्लागार - रोहित सराफ, नानासाहेब गटगिळे कार्यकारिणी सदस्य..रघुनाथ बागडे,प्रकाश अदापुरे, सुधाकर त्यारे, गोकुळ लोळगे, दिनेश लोळगे,मिलिंद बागडे, गणेश मैड, गणेश जोजारे, दिपक आळंदीकर, शिवाजी क्षीरसागर, महेश ओसवाल, बाळासाहेब पवार, प्रवीण पळसकर, योगेश गटगिळे आदी उपस्थित होते तर सराफ असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आळंदीकर यांचा सत्कार चंदूकाका सराफ पेढीचे प्रमुख किशोर शहा ( सराफ ) व सभासद यांनी केला.