दाैंड तालुक्यात प्रचंड वारा व विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाची हजेरी
दाैंड तालुक्यात दाेन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात असलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र आज सकाळ पासूनच आकाशात पावसाळी ढगांची गर्दी दिसत हाेती.त्यामुळेच सायंकाळी पाच सुमारास दाैंड तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची उकाडयापासून सुटका झाली.तर दुसरीकडे जाेरदार झालेल्या पावसामुळे शेतांमधून पावसाचे पाणी वाहत असलेले पाहून शेकतरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
मात्र नित्याच्याच असलेला विद्युत वितरण च्या अतिदक्षतेमुळे पाऊस सुरु हाेण्यापुर्वीच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील छाेटे माेठे व्यावसायिक हैराण झाले असून दाैंड तालुक्यातील नागरिक व व्यावसायिकांमधून विद्युत विसरण्याच्या अनागाेंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.