अमृता सकट ठरल्या होम मिनिस्टर l हेमंत गडकरी
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
होळ येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात अमृता हनुमंत सकट या होम मिनिस्टर ठरल्या असून त्यांनी स्मार्ट टीव्ही व मानाची पैठणी पटकावली आहे.
होळ येथे शिवाकाका कारंडे फाउंडेशनच्या वतीने सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर यांचे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला होळ, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द, मुरूम, मुढाळे परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
खेळातील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे
अमृता सोमनाथ सकट - स्मार्ट टीव्ही व मानाची पैठणी, स्वप्नाली प्रशांत कदम - कुलर व पैठणी, जया प्रसाद कदम - मिक्सर व पैठणी, अश्विनी भगवान कदम - पॅन सेट व पैठणी, रेश्मा नौशादअली शेख - फॅन व पैठणी, पूनम राजकुमार माने - चांदीचा गणपती फ्रेम व पैठणी
पुढील काळातही शिवा काका कारंडे फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविणार असल्याची माहिती फाउंडेशनचे स्वप्नील कारंडे यांनी दिली