वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनहद्दीत पोलीसांनाच चकवा देत एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी...
वडगाव निंबाळकर (ता बारामती) येथे ठिकाणी आज शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी एक नाही दोन नाही .... पाच ठिकाणी घरफोडी केली यामध्ये त्यांनी सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लांबवली आहे.
विशेष म्हणजे वडगाव निंबाळकर हे गावं वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत काही अंतरावरच आहे तरीसुद्धा, बनकर वस्ती जाधव वस्ती, जाधव आळी या ठिकाणी मध्यरात्री जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. को-हाळे परिसरात मागील एक दिवसापूर्वी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांच्या भीती निर्माण झाली होती यावेळी पोलिसांनी नागरिकांना भिऊन न जाता सतर्क राहण्याचे आव्हान केले होते. असे असतानाच पोलिसांनी सतर्कता रहावे असे आव्हान देत एकच दिवस उलटला की लगेचच चोरट्यानीं पोलिसांनाच घरफोडी करून दाखवत आम्ही भी हुशार आहोत असे जणू आव्हानच दिले आहे. हद्दीतून पोलिसांची रात्री गस्तीची गाडी या भागातून जाऊन देत व परत येत नसल्याचे खात्री करत चोरट्यांनी काही वेळातच घरफोडी केली असल्याची माहिती संबंधित गावातील नागरिकांनी दिली.या घरफोडी मध्ये पत्रकार सुनील जाधव यांच्या घरही फोडले व चोरट्यांनी दीड लाखाची रोख रक्कम व आठ ते दहा तोळे सोने लांबवले असल्याची माहिती जाधव यांनी बोलताना दिली. झालेल्या या घरफोडीचा पोलीस यंत्रणा किती लवकर छडा लावतील याकडेच सर्वांचे लक्ष राहणार असल्याचे ही नागरिकांकडून बोलले जात आहे.