Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ! ज्येष्ठ नगरसेवक आणि नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पत्नी हेमलता गुजर यांचे निधन

निधन वार्ता ! ज्येष्ठ नगरसेवक आणि नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पत्नी  हेमलता गुजर यांचे निधन
बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पत्नी सौ. हेमलता गुजर यांचं आज अल्पशा आजारामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान, आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

हेमलता गुजर या भाभी या नावानं सर्वत्र परिचित होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात त्या हिरीरीने सहभागी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेमलता गुजर यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, हेमलता गुजर यांच्यावर आज रात्री ८ वाजता बारामती शहरातील चांदशहावली दर्गाजवळील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test