मुढाळेत आजपासून श्री भैरवनाथ यात्रेस सुरवात
मुढाळे प्रतिनिधी (शंतनु साळवे)
मुढाळे (ता.बारामती) येथे सालाबादप्रमाणे आजपासून श्री भैरवनाथ यात्रा उत्सवास सुरुवात होणार आहे. यात्रेनिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी श्रींचे लग्न, त्यानंतर महाप्रसाद व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत श्रींचा शाही पालखी सोहळा होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.११) सकाळी ११ ते ३ व रात्री ७ ते १० या वेळेत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती भैरवनाथ यात्रा कमिटी यांनी दिली.