Type Here to Get Search Results !

घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारीचा आवाज घुमणार

घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारीचा आवाज घुमणार...




बारामती  लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया मतदातांनी मतदान करत मंगळवारी रोजी सर्वत्रच शांततेत मतदान पार पडली 
मिळालेल्या माहितीनुसार ५६.०७ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील३८ उमेदवारांचे प्रतिष्ठा ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाली आहे...गेल्या वर्षी याच  मतदारसंघातून ६१.७ टक्के  मतदान झाले होते. झालेल्या लोकसभा निवडणूक मतदानाचे मतमोजणी मतमोजणी पुढील महिन्यातील मंगळवार  दि. ४ जून रोजी होणार आहे. बारामती तील  शरदचंद्र  पवार यांची कन्या सुप्रिया सुळे निवडणूक चिन्ह  तुतारी आणि उपमुखयमंत्री अजितदादा पवार यांची पत्नी  सुनेत्रा पवार निवडणूक चिन्ह  घड्याळ...अशी  नणंद-भावजय प्रमुख लढ़त होती . जगभरातून या लढतीकडेच लक्ष लागले असल्याचे दिसत आहे... मतदानास मंगळवारी सकाळी सात वाजता सुरवात झाली होती , लोकसभेत , बारामती, दौंड, इंदापूर , पुरंदर,खड़कवासला आणि भोर ,वेल्हा, मुळशी या सहा (६ ) विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  येथून २३ लाख ७२ हजार मतदार होते, तर २ हजार ५१६ मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज होती, बारामती मतदारसंघाचा ग्रामीण भागहा सर्वाधिक मोठा होता. काही मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपत आली तरी अधिकचा वेळ मतदान करण्यासाठी मतदात्यांनी घेत आपला पवित्र हक्क बजावला....
मतदान केंद्रावर कडवी नजर ठेवत यावर्षी  प्रथमच ५० टक्के   १ हजार २७८ मतदानकेद्रावर २ हजार ६२५ कंमेन्यांदारे वेवकास्टिंगची सूविधा देण्यात आली होती . जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. सुहासर दिवसे, विधानभवन येथील बारामती निवडणूक कार्यालयातून निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवदी यांनी मतदान प्रकियेवर लक्ष ठेवत...सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडले
    सर्वं मतदान  केंद्र वरील मतदान  सूरळीत पणे झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारीकविता द्विवेदी यांनी दिली.




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test