करंजेत सायंकाळी सहा वाजले तरी युवक ,महिला तसेच जेष्ठ नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद ; शंभर टक्के होण्याच्या उंबरठ्यावर.
सोमेश्वरनगर - बारामती येथे करंजेतील सायंकाळी सहा वाजले तरी युवक ,महिला तसेच जेष्ठ नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसत आहे तसेच शंभर टक्के मतदान होण्याच्या उंबरठ्यावर असताना दिसत आहे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे तसेच पोलीस अधिकारी अमोल भोसले , रमेश नागटीलक उपस्थित होते.
मंगळवार रोजी असणाऱ्या देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. ११ राज्यातील लोकसभेच्या एकूण ९३ जागांवर मतदान होतय. महाराष्ट्रात ११ जागांवर मतदान होतय. यात बारामती लोकसभेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे.
बारामतीमध्ये यंदा चुरशीची निवडणूक आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. काका-पुतण्यामधील ही लढाई आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली आहे.
४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.