Type Here to Get Search Results !

सूंदर भेट ! ९५ वर्षाची बहीण जेंव्हा....भावाच्या भेटीला येते तेव्हा.....बहीण आणि भावाचे नातं अतूट असते हे सिद्ध ...!

सूंदर भेट ! ९५ वर्षाची बहीण जेंव्हा....भावाच्या भेटीला येते तेव्हा.....बहीण आणि भावाचे नातं अतूट असते हे सिद्ध ...!

विशेष प्रतिनिधी(शब्दांकन- डॉ संतोष जठार)

वेड्या बहिणीची ही वेडी माया.... फुलोका तारोका सबका कहना है...!.. एक हजारो मे मेरी बहना है..!
  या गीता याप्रमाणे..... अहमदनगर  येथील श्री भीमाशंकर शेटे यांच्या सहचारिणी आणि सासवड येथील चौधरी परिवारातील कन्या कुसुम... श्रीमती कुसुम भीमाशंकर शेटे (निन्नी , टोपण नाव अगदी जवळचेच नातेवाईक निन्नी म्हणून बोलवत असत  त्यात माझे वडील) रा. अहिल्यानगर वय वर्ष ९५....
निवृत्त नायब तहसीलदार श्री.सतिष शेटे,श्री.सुहास श्री.सुभाष आणि श्री.संजय यांच्या मातोश्री श्रीमती कुसुम भीमाशंकर शेटे आणि आमचे वडील श्री विठ्ठलराव जठार सख्खे मावस बहीण भाऊ...
पण जेव्हा श्री.सतिष शेटे यांनी काष्टीला विठ्ठल मामाला भेटायला जायचं आहे अस कुसुम आत्याला सांगताच....मला विठ्ठल ला भेटायला यायचं.... येरवी कधी ही बाहेर न पडणारी आत्या आज मात्र भावाची भेट होईल या एकमेव उद्देशाने बाहेर पडली.....निम्मित होतं भेटीचं आणि डॅडीच्या वाढदिवसाचं आणि वय वर्ष ९५

९५ वर्षाची बहीण भावाच्या भेटीला निघाली....एक दिड तासाचा प्रवास करून काष्टी मध्ये गाडी पोहचली..... सर्व जण गाडीतून उतरले....शेवटी मात्र आत्या उतरली.... आत्याला पाहतच राहिलो....इतकं वय झालेलं असताना ही फक्त भावाच्या भेटीला आलेली आत्या... थर थर पावलांनी एक एक पाऊल पुढे टाकत होती....इतकी ती वाकलेली असताना जिना चढून जायचं होत चढेल की नाही शंका थोड्या वेळ मनात आली....की उचलून न्याव वरती असा ही मनात विचार आला....
     
 पण जुने माणस ती..... थोड्या  वेळ पायरी वर बसून पुन्हा वरील जिना चढायला लागली.....हात हातात घेतला पण तरी ही नको संतोष नको धरू मी जिना चढते....अस मोठा करारी बाणा दिसून आला....जिण्याचे रेलिंग धरून आत्या एक एक पायरी वाकून च चढू लागली....आणि एक साधारणतः १५ /१६ पायऱ्या चढून आत्या वर आली....
 आल्या नंतर आत्या थेट भावाला भेटायला जवळ गेली....आणि चेहऱ्यावरून हात फिरवत डोक्यावर बोटं मोडली....जुन्या लोकांची आपल्या माणसा प्रती प्रेम व्यक्त करण्याची रीत...
आत्याला तसे वयाच्या मानाने थोड ऐकायला कमी झालं होतं....त्यामुळं थोड्या मोठ्या आवाजात बोलावं लागत होत....
आत्याचे वय जरी झालं असलं तरी स्मरणशक्ती मात्र दांडगी....समोर येताच बहीण भावाच्या थोड्या संवादाने डोळ्यात अश्रू उभे राहिले....आत्या डॅडींच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती....आणि डोळ्यात अश्रू उभे राहत होते.... खूप वर्ष भेट झाली नव्हती ना.....थोड्याच वेळात सर्व वातावरण भावनावश झालं...बोलता बोलता सर्व जण स्तब्ध होऊन बहीण भावाच बोलण बारीक ऐकत होते....या भेटी मुळे चर्चा खूप मागे गेली खूप वर्ष मागे गेली....अनेक जुन्या आठवणींना उजाळा देऊन ही भेट गेली.....सासवड पुणे नगर येथील येणे जाणे असेल....आपुलकी ने बोलणं असेल....सर्व काही गोष्टी अगदी एका क्षणात ताज्या झाल्या...आत्याच्या आणि डॅडींच्या डोळ्यातील अश्रू तरळले आणि आनंदाश्रू  घळा घळा वाहू लागले पण त्या अश्रू मध्ये ही एक आनंद होता भेटीचं समाधान होत....कुसुम आत्या वय वर्ष ९५ असताना देखील काष्टी येथे आली याच मला विशेष कौतुक वाटतं
भावाला भेटायला आणि भेटीची ओढ काय असते हे काल कुसुम आत्याला पाहताच लक्षात आले....

वास्तविक पाहता पहिल्या लोकांकडे आपुलकी जिव्हाळा प्रेम होते ... फक्त औपचारिकता नव्हती जी आज पहायला मिळते....
पुन्हा एकदा श्री. नितिन शेटे श्री. सतिष शेटे श्री.सुहास शेटे आणि सौ. सुनंदा ताई सौ.उषा वहिनी यांचे अतिशय मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद....आपल्या मुळे आज बहीण भावाच्या भेटीला योग आला.....आणि शिवाय भेट रुपी भेट ही एका बहिणीने भावाला वाढदिवसानिमित्त  दिली असे म्हटल तरी वावग ठरणार नाही....
तसेच या निमित्ताने पुणे येथील कुलवंत वाणी धर्मशाळा ट्रस्ट (मांगल्य) चे विश्वस्त श्री.जयंतशेठ सजगुरे श्री.हेमंत शेठ चौधरी यांनी देखील आमचे वडील श्री.विठ्ठलराव जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच केक कापून वाढदिवस साजरा केला....त्यांचे ही अतिशय मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद.....
तुमच्या सर्वांमुळे वाढदिवस संस्मरणीय क्षण ठरला....
तसेच यावेळी श्री.हेमंतशेठ  चौधरी यांचा देखील वाढदिवस साजरा केला त्यांना ही यावेळी शुभेच्छा दिल्या....तसेच वाढदिवसाच्या  निमित्ताने ज्या ज्या सर्वांनी अनमोल अशा शुभेच्छा दिल्या त्यांचे....अतिशय मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद...

कौटुंबिक शब्दांकन- डॉ संतोष जठार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test