दाैंड सिध्दटेक रस्ता ठरताेय मृत्यूचा सापळा- दाैंड पाेलीसांचे दुर्लक्ष
दाैंड तालुका प्रतिनिधी(सुभाष कदम) - दाैंड सिध्दटेक रस्त्यावर मारुती सुझुकी व महेंद्रा पिकअपचा भिषण अपघात
दाैंड सिध्दटेक रस्त्यावर रात्री ११ च्या सुमारास दाैंडहून सिध्दटेक कडे जाणारी मारुती सुझुकी कार नंबर एम एच ०२ बीपी २४४६ व सिध्दटेक कडून दाैंडकडे येणारी पीकअप नंबर एम एच ४२ अेक्यू ३६६० या दाेन वाहनांचा रात्री ११ च्या सुमारास समाेरासमाेर जाेराची धडक झाल्याने दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झालेले आहे. दाेन्ही वाहनांचे चालक व अन्य प्रवाशी जबर जखमी झाले असल्याची परिसरात चर्चा असून संबंधित चालक व इतर प्रवासी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
संबंधित अपघात भिषण स्वरुपाचा असूनही दाेन्ही वाहन चालक व मालकांकडून २४ तासानंतरही दाैंड पाेलीसात तक्रार दाखल केली नसल्याचे दाैंड पाेलीसांकडून सांगण्यात आले. दाैंड पाेलीसांनी संबंधित भिषण अपघात प्रकरणी दाेन्ही वाहनांवर व चालकांवर गुन्हे का दाखल केले नाहीत.याबाबत नागरिकामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.एकंदरीत दाैंड सिध्दटेक हा अष्टविनायक मार्ग असतानाही या मार्गावर वाहन चालक हे मद्यपान करुनच वाहने चालवित असल्याचे चर्चा सुरू आहे.या कामी दाैंड पाेलीस स्टेशनच्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे कायमच दुर्लक्ष असल्याचे नागरिकांमधून बाेलले जात आहे.
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम