विद्या प्रतिष्ठान स्कूलचा श्रेयस साळुंखे ला ९२.६० ℅ टक्के गुण ... सोमेश्वर परिसरातून कौतुक
सोमेश्वरनगर प्रतिनिधी-
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा सी.बी.एस ई. १०वी आणि १२वीचा वार्षिक निकाल हा शंभर टक्के निकाल लागला असून यावर्षी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी मिळवली आहे.
यामध्ये इयत्ता १० वी तील श्रेयस दत्तात्रेय साळुंखे यास ९२.६० ℅ टक्के गुण मिळवत यश संपादन केले असल्याने श्रेयसला सोमेश्वर परिसरातून कौतुक होत अभिनंदन चा वर्षाव होत आहे.