टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती
पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा- लेप्टनंट कर्नल हंगे
पुणे :- टाटा स्मारक हॉस्पिटल, मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा रक्षक व वाहन चालक ही पदे शैक्षणिक अर्हता धारक माजी सैनिकांकडून भरण्यात येणार असून पात्र व इच्छुक माजी सैनिकांनी
https://tmc.gov.in/def/inst.aspx
या संकेतस्थळावर ९ मे अखेर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे तर्फे करण्यात आले आहे.
टाटा स्मारक हॉस्पिटल मुंबई येथे सुरक्षा सहाय्यक १ पद अराखीव, सुरक्षा रक्षक अराखीव २ पदे, इतर मागास प्रवर्ग २ पदे, अनुसूचित जाती ३ पदे, अनुसूचित जमाती ३ पदे व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग १ पद अशी ११ पदे तर वाहन चालक संवर्गातील अराखीव, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रत्येकी १ पद अशी ४ पदे भरती करण्यात येणार असून उमेदवारांनी भरतीचे नियम अवलोकन करून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून जतन करावीत. अर्जाची हार्ड कॉपी पाठविण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी अर्जदारांनी मानव संसाधन विभाग भरती कार्यालय, ०२२-२४१७७००० विस्तार क्रमांक ४६२७ व ४६२७ वर संपर्क साधावा.
पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे, आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेप्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि) यांनी केले आहे.