Type Here to Get Search Results !

खान्देशवाशीयांचा स्नेह मेळावा बारामती मध्ये उत्साहात संपन्न... कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन....

खान्देशवाशीयांचा स्नेह मेळावा बारामती मध्ये उत्साहात संपन्न... 
कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन.... 


बारामती प्रतिनिधी-  बारामती आणि परिसरामध्ये राहत असलेले धुळे, जळगाव, नंदुरबार मधील खान्देशच्या कुटुंबांचा स्नेह मेळावा काल उत्साहात पार पडला.  यावेळी नामदार अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री.  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी शपथविधीचा प्रसंग अहिराणी भाषेमध्ये सांगितला यावेळी घडलेला विनोद व इतर घडामोडी कशा पद्धतीने होत होत्या याची माहिती मनोरंजन पध्दतीने दिली. उपस्थित खानदेशी कुटुंबीयांनी देखील मंत्री महोदयांना तेवढीच दात दिली, यामुळे हा कार्यक्रम आणखीनच रंगतदार झाला.  यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे व सौ मुग्धा खलाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अखिल खानदेश मित्र मंडळाच्या सर्वच सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test