...त्या धाेकादायक विद्युत राेहित्रांच्या दुरुस्तीची मागणी
दाैंड तालुका प्रतिनिधी (सुभाष कदम)- दाैंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत राेहित्रांची दुरावस्था
दाैंड तालुका विद्युत महावितरण कंपनीच्या हद्दीतील बहुतेक विद्युत राेहित्रांच्या परिसरात काटेरी झुडपे,गवत व वेलींचा विळखा पडलेला असल्याने विद्युत राेहित्रातील शाँटसर्किटमुळे या वनस्पती,वेली व गवतांना आग लागून परिसरात माेठ्या धाेक्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
दाैंड शहरातील गजानन साेसायटीच्या गेटवरच असलेल्या विद्युत राेहित्रातून शाॅटसर्किट हाेऊन विद्युत राेहित्राच्या परिसरातील गवताने व वनस्पतींनी भरदुपारीच पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली हाेती.मात्र विद्युत वितरणचे कर्तव्य दक्ष कर्मचारी अमाेल चाेरमले व त्यांच्या सहका-यांनी परिसरातील नागरीकांच्या मदतीने पेटलेलेगवत,झाडाझुडपांवर पाणी टाकून लागलेली प्रचंड आग आटाेक्यात आणली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
एकंदरीत दाैंड शहर व ग्रामीण भागातील विद्युत राेहित्रांच्या दुरावस्थेमुळे शेतकरी व रहिवाशांना अनेक वेळा माेठ्या संकटांना सामाेरे जाण्याचे प्रसंग येतात.कित्येक शेतक-यांना विद्युत राेहित्रांतील बिघाडांची दुरुस्ती करत असताना आपला जीव ही गमवावा लागला असल्याचे वास्तव चित्र आहे.
मात्र असे असूनही विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी त्या दुरावस्था झालेल्या विद्युत राेहित्रांकडे का लक्ष्य देत नाहीत.असा प्रश्न नागरिक व शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. तर
सध्या अवकाळी पाऊस व प्रचंड सुटलेल्या वादळी वा-यांमुळे बहुतेक भागातील पडलेले विद्युत खांब व तुटलेल्या तारांमुळे कित्येक तास विद्युत पुरवठा खंडीत हाेत असल्यामुळे व्यावसायिक,नागरिक व शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा तालुक्यात चालू आहे.