Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता १० व १२ चा निकाल शंभर टक्के.

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा
इयत्ता १० व १२ चा निकाल शंभर टक्के. 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- 
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील 
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा सी.बी.एस ई. १०वी आणि १२वीचावार्षिक निकाल हा  शंभर टक्के निकाल लागला असून यावर्षी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमधून कु. समिधा संतोष दरेकर या विद्यार्थ्यानीने ९३.२०% इतके गुण मिळवत  प्रथम येण्याचा बहमान मिळवला तर इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेमधून कु. साक्षी योगीराज खोमणे हिने ९१.४०% इतके गुण मिळवुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. इयत्ता१२वी विज्ञान शाखेमधून सर्वच्या सर्व मुलांना ७०% हुन अधिक गुण मिळाले आहेत.१२ वी विज्ञान शाखेमधून कु. साक्षी जाधव व कु. प्रणाली शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय वतृतीय येण्याचा मान मिळवला तसेच १२वी वाणिज्य शाखेमधून कु. आदित्य वर्तक व व कु.पृथ्वीराज म्हेत्रे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत देखील शाळेने आपली १००% निकालाची परंपरा अबाधित ठेवली आणि अतिशय नेत्रिदीपक यश संपादन केले. दहावीच्या परीक्षेमध्ये कु. पुष्कर जितेंद्र धायगुडे याने ९५.६०% संपादित करून प्रथम क्रमांक पटकाविला तर स्मित जगताप, प्रणाली खोड़के व कु. अरमान इनामदार, कु. शिवम गावडे यांनी अुनक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम परीक्षांमध्ये असे यश संपादित केल्याने विदया प्रतिष्ठान संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

● कु. समिधा संतोष दरेकर ९३.२०% --१२ वी विज्ञान
● कु. साक्षी योगीराज खोमणे ९१४०%--१२ वाणिज्य
● कु. पुष्कर जितेंद्र धायगुडे ९५.६०%---१० वी



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test