एका बाजूला उष्णतेचा कहर सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात पावसाचा शिरकाव चालू झाला आहे काही दिवसांपासून दिवसभर उष्णतेची धग नागरिकांना सतावत होती ते गारवा शोधत होते.. असे असताना सायंकाळच्या सुमारास पावसाचा शिरकावा चालू झाल्याने वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..विजांचा कडकडाट होत असल्याने महावितरण कडून वीज खंडित केली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. 16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे.