अभिमानास्पद ! माळेगांवच्या निरंजन महेंद्रसिंहराजे जाधवराव या सुपुत्राने UPSC मधे मिळवले यश
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील
माळेगांवच्या निरंजन महेंद्रसिंहराजे जाधवराव या कर्तबगार सुपुत्राने UPSC मधे यशाचा रोवलेला, फडकवलेला झेंडा.
निरंजनने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २८७ वी रँक मिळवली आहे आणि त्याचे हे यश उत्तुंग असेच आहे.
UPSC त यश मिळावे यासाठी देशभरातून तब्बल दहा ते पंधरा लाख विद्यार्थी प्रलियम देतात. त्यातून मेन्स, अंतिम मुलाखत या प्रक्रियेतून अवघे सहाशे ते सुमारे नऊशे विद्यार्थी यशस्वी होतात. त्या लाखांमधील एक लखलखता तारा निरंजन जाधवराव ठरला आहे. त्यांचा आनंद, अभिमान खूपच. निरंजनचे सर्व शिक्षण माळेगांव, बारामती येथे झाले. इथेच मेकॅनिकल इंजिनिअर झालेल्या या कर्तबगार तरुणाने आपल्याच मातीत शिक्षण घेऊन पुणे, दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रचंड अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवले आहे.
अगदी काहीच दिवसांपूर्वी जाधवराव यांच्या माळेगाव येथील अमरबाग पॅलेसला भेट दिली होती. तेव्हाच निरंजनचे आई वडील महेंद्रसिंहराजे आणि ऐश्वर्यादेवी यांची भेट झाली. त्यावेळीही निरंजन यांच्या अभ्यासाबद्दल चर्चा होऊन निरंजन नक्की यशस्वी होईल अशा सदिच्छा, शुभेच्छा दिल्या होत्या. त्या प्रत्यक्षात साकारल्या याचाही आनंद फार मोठा.
निरंजनचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्या अर्थाने या यशाचे मोल खूपच. त्यामुळे या मौल्यवान कर्तबदारीबद्दल अतिव आनंदातून निरंजनचे खूप खूप अभिनंदन. प्रशासकीय सेवेतून त्याच्या हातून घडणाऱ्या देशसेवेसाठी निरंजनला मनःपूर्वक शुभेच्छा..!