Type Here to Get Search Results !

आंबेडकर जयंती च्या निमित्ताने M NEWS मराठी चे संपादक श्री मधुकर बनसोडे यांच्याशी झालेला रोखठोक मनमोकळा संवाद त्यांच्या शब्दात..!!!

आंबेडकर जयंती च्या निमित्ताने M NEWS मराठी चे संपादक श्री मधुकर बनसोडे यांच्याशी झालेला रोखठोक मनमोकळा संवाद त्यांच्या शब्दात..!!! 
विशेष रिपोर्ट -  चंद्रजित काकडे
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठित निंबुत गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सन १९८४ साली मधुकर यांचा जन्म झाला.वडिलांचा मृत्यू घरची परिस्थिती आणि जबाबदारी यामुळे दहावी पर्यंत च शिकता आले.कुटुंबात आई तीन बहिणी त्यांच्या लग्न झाल्यानंतर वयाच्या २४ व्या वर्षी मधुकर यांचेही लग्न झाले. घरची तीन एकर शेती ,दुग्ध व्यवसाय, हे उदरनिर्वाहाचे साधन होते आहे. खरंतर या वयात माणूस भरकटतो वाईट व्यसन वाईट मार्ग अवलंबतो मात्र नींबूचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे कधीही वाईट विचार मनामध्ये आले नाहीत  राजकारण,समाजकारण हे करत असताना पत्रकार क्षेत्रात मु सा काकडे कॉलेज वरचे सर माझे मित्र श्री अमोल लकडे व श्री अमोल काकडे यांच्या प्रोत्साहनामुळे आणि बारामती चे मार्गदर्शक मित्र शिवाजी जगताप व बारामती LIVE चे संपादक अमित बागडे यांनी केलेल्या मार्गदर्शन यामुळे या क्षेत्रात आज यशस्वीपणे चार वर्ष काम करत आहे.दोन वर्ष पत्रकार म्हणून आणि त्यानंतर स्वतः चा M NEWS मराठी या वेबपोर्तल चा संपादक म्हणुन.हे सर्व करीत असताना कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना दुग्ध व्यवसायात पत्नीची आणि शेतीत आईची साथ मिळाली याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दोन मुली एक मुलगा असा परिवार मोठी ला कलेक्टर व्हायचे आहे,दुसरी शिक्षिका आणि मुलगा देशाच्या संरक्षण खात्यात काम करण्याची इच्छा आहे आहे मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्यावर जी वेळ आली ती मुलांवर येऊ नये म्हणून जीवाचे रान करण्याची तयारी मधुकर यांची आहे ...!!!
                     सन २०१० साली शहाजीकाका तत्कालिन अध्यक्ष सोमेश्वर कारखाना यांच्या मार्गदर्शनाखाली निंबुत ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. त्याबदल्यात सोमेश्वर कारखान्यात कामही लागले. परंतु काका चे अध्यक्ष पद गेल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून ती नोकरी गेली.पुढे भरपूर ती नोकरी टिकण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यास यश नाही मिळाले.
                       सन २०१५ साली पुन्हा निंबुत ग्रामपंचायत निवडणूक यावेळी उमेदवारी आईला मिळाली ती निवडूनही आली.२०१५- २०२० साली ग्रामपंचायत ची कामे करत असताना गोरगरीब,विधवा, निराधार लोकांकरिता स्वखर्चाने घरकुल,शेती उपयोगी अवजारे,DBT योजना या सर्वसामान्य वंचित घटकापर्यंत पोहचवल्या...!!!
सतिश भैय्या नी सांगितल्या प्रमाणे ८० % समाजकारण आणि २० % राजकारण यापद्धतिने काम केले.यामध्ये सर्वात जास्त २०२० साली कामे झाली ती तत्कालिन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोदकाका यांच्यामुळे...त्यांना उद्धाटन किंव्हा वाटप कार्यक्रमाला बोलावले तरी ते म्हणायचे तुम्ही करून घ्या एवढ्या मोठ्या मनाचा माणूस मी आजवर पाहिला नव्हता. कोरोना काळात रात्रीचा फोन केला तरी काका फोन उचलायचे आणि आरोग्य खात्याशी काम मार्गी लावायचे.परंतु त्यांनी कधीही श्रेयवाद किंव्हा गवगवा, जाहिरात केली नाही.हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.
               दरम्यान च्या काळात *सतिश भैय्या,शहाजी काका आणि प्रमोद काका* या दिग्गजांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभल्याचे समाधान वाटते.
                  सतिश भैय्या नी अनपेक्षित पने बारामती इंदापूर युनियन च्या संचालक पदी काम करण्याची संधी दिली खर तर ही माझ्या कामाची शाबासाकीची थाप व पोचपावती होती.परंतु यामुळे स्वपक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज झाले यातून कुरघोड्या,अफवा माजल्या आणि यातून कुठेतरी थांबण्याचा/ अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.आता आनंदाचे जीवन जगत आहे. चांगलं काम करत असताना विरोधक ही तयार होतात परंतु याकडे दुर्लक्ष्य करून पुढे चालायचे हे ठरवले असल्याने प्रत्येक गोष्टीचा विचार नाही करायचा यातच यश असते.*खर तर माणसाला त्याच काम मोठ करत असतं* स्वतःच्या जीवनाशी जो संघर्ष करेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
            वेबपोर्टल काढणे हे सोपं काम आहे परंतु ते चालवणे आणि टिकवण हे शिवधनुष्य पेलणे खूप कठीण काम आहे ते या अवलियाने लीलया पार पाडले ...!!!!
                                                 
श्री मधुकर बनसोडे आपणांस आपल्या आणि आपल्या वेबपोर्टल च्या उज्वल भवितव्यांसाठी तसेच येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेकांत मनस्वी शुभेच्छा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test