भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती निमित्ताने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात जाऊन त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या निमित्ताने पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात जाऊन त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
या ठिकाणी जनसागर लोटला होता. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत होते. त्यातील एक असणाऱ्या एकता मिसळ उपक्रमास भेट दिली. या उपक्रमांतर्गत मोफत मिसळ उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमाचे स्वयंसेवक अत्यंत शिस्तीत हा उपक्रम पार पाडत होते. या ठिकाणी सर्वत्र प्रचंड गर्दी असूनही सर्वजण स्वयंशिस्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत अभिवादन करत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, महानंदच्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी मला तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. ही भेट नम्र भावाने स्वीकारली. या भेटीबद्दल खूप खूप आभार मानले.