सुनेत्रा पवार यांच्या इंदापूर दौऱ्याला सुरुवात; ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं उत्स्फूर्त स्वागत..
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी घोलपवाडी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.. घोलपवाडी येथील ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार यांचं उत्स्फुर्तपणे स्वागत केलं. आजवर अजितदादांनी नेहमीच इंदापूर तालुक्याला झुकतं माप दिलं आहे.. बारामतीला लागूनच असलेला हा तालुका म्हणजे आमचं कुटुंबच आहे.. त्यामुळं इंदापूरची जनता भक्कमपणे आम्हाला साथ देईल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला..