ढाकाळे गावातील ग्रामस्थांना सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट;विविध विकासकामांबाबत चर्चा
बारामती प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गाव भेटी दौऱ्यात ढाकाळे गावातील ग्रामस्थांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. माळेगाव कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवबापू जगताप यांनी सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची शक्ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातच असल्याचे सांगून त्यांच्या माध्यमातून झालेले विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी सरपंच चंद्रसेन जगताप उपसरपंच सविता सूर्यकर, उत्तमराव जगताप, शुभम जगताप, मुकुंदराव जगताप, निलेश कलाटे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. ढकाळी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे मनापासून आभार.