बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यानिमित्त भोर मधील वेळू येथे सुनेत्रा पवार यांचे जंगी स्वागत
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यानिमित्त भोर तालुक्यात जाताना प्रवेशद्वारावर वेळू येथे स्वागत झाले. शिवसेनेचे भोर तालुकाप्रमुख अमोल पांगारे यांनी आयोजित केलेल्या या स्वागतावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे, राष्ट्रवादीचे नेते विक्रमदादा खुटवड, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवनआण्णा कोंडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते. या भव्यदिव्य अलोट गर्दीच्या स्वागताने भोर तालुक्यातील दौऱ्याला सुरुवात झाली.