निंबुतच्या काकडे यांची साहेबांना साथ; परिसरात घुमणार तुतारीचा आवाज
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेल्या निंबुत येथील काकडे परिवारातील सोमेश्वरनगर परिसरात क्रीडा शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले संदीप काकडे हे उच्चशिक्षित अभ्यासू मितभाषीय व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रात काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले अनेक विद्यार्थी उच्च पदावर देखील कार्यरत आहेत ... सध्या आगामी लोकसभा निवडणुक आहे यामध्ये निंबुत येथील संदीप लालासाहेब काकडे व जगताप परिवार जगताप वस्ती यांनी रविवार दि ७ रोजी बारामतीतील गोविंदबाग येथे काकडे जगताप कुटूंब व मित्र परिवार एकत्र येत राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुक व पुढील काळात सदैव आपल्या सोबत असल्याचे पत्र देण्यात आले ... भेटी दरम्यान शरदचंद्र पवार म्हणाले की अरे संदीप ... काकडे हे सदैव माझ्याबरोबरच असतात असे स्मित हास्य करत साहेब बोलले तर आपण सर्व युवा उच्चशिक्षित मित्रपरिवार माझ्यासोबत असल्याचे आनंद वाटत कौतुक केले.