आईसाठी जय पवार यांची रिमझिम पावसातही सभा; शरद पवार यांच्या मित्रांसमवेत जय पवार यांचा प्रचार दौरा..
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे मागील अनेक दिवसांपासून आपल्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी दौरे करत आहेत.. आज जय पवार यांनी बारामतीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे बालपणीचे मित्र चंद्रराव तावरे, प्रचारप्रमुख बाळासाहेब तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, भाजपचे नेते रंजन तावरे यांच्यासह माळेगाव परिसरात प्रचारदौरा केला.. माळेगाव येथील कोपरा सभेत जय पवार यांच्या भाषणावेळी रिमझिम पाऊस सुरु झाला. मात्र जय पवार यांनी पावसातही भाषण सुरु ठेवत आई सुनेत्रा पवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं..