जेजुरी ! काशिनाथशेठ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी तीन गरजू महिलांना 'एक हात मदतीचा' उपक्रम राबवतात.
पुणे प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील काशिनाथशेठ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माधवी माधव सोनवणे यांच्यामार्फत महिला स्वयं रोजगार निर्मितीसाठी एक हात मदतीचा म्हणून समाजभगिनी श्रीम. रेणुका विशाल शेटे मु. पो. शेवगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर यांना मराठी नववर्षानिमित्त(गुडी पाडवा)पिठाची गिरणी सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी सौ. माधवी माधव सोनवणे या नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात तर त्या प्रत्येक वर्षी तीन गरजू समाजभगिनींना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी एक व्यवसाय सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली त्यामध्ये शिलाई मशीन, पिकोफॉलमशीन, पिठाची गिरणी, शेवया मशीन, कांडप यंत्र, यापैकी कोणतेही एक मशीन देऊन मदत केली आहे .या कर्याबद्दल जेजुरी येथील माधव सोनवणे परिवाराचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.