राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा सरचिटणीस पदी सुधीर गायकवाड यांची निवड
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजेपुल येथील सुधीर निवृत्ती गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मध्ये पुणे जिल्हा सरचिटणीस पदी निवड युवा नेते योगेंद्र दादा पवार यांच्या शुभ हस्ते बारामती येथील कार्यक्रम मध्ये नियुक्तीपत्र देत करण्यात आली .
यावेळी बारामती व्यापार औद्योगिक सेल तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते राजेंद्र बापू जगताप ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष केतन भोसले ,बारामती तालुका उपाध्यक्ष प्रदीप शेंडकर , कार्याध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.