रिमझिम पाऊसात बैलगाडीतून मिरवणुक; दौंडच्या लिंगाळी ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचं अनोखं स्वागत..
दौंड, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी लिंगाळी गावात पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं.. लिंगाळी ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार यांची बैलगाडीतून मिरवणुक काढली.. हलगीचा गजर आणि पावसातून निघालेली मिरवणुक अशा अनोख्या वातावरणात झालेलं सुनेत्रा पवार यांचं स्वागत अनोखं ठरलं..
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला..