सुनेत्रा पवार यांच्या दौंड तालुका दौऱ्याला सुरुवात; दौंडमध्ये महायुतीचे नेते एकवटले.. आजी-माजी आमदारांचा सहभाग..
दौंड, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली..
या दौऱ्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जग
दाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
दाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख एकवटले आहेत. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भुमिका घेवून सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील रहावं असं आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केलं.
देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणुक आहे. विकासाला महत्व देणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची भुमिका आपण घेतली पाहिजे असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केलं. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात सामील होवून विकासरथात सहभागी होवून घड्याळाला अधिकाधिक मतदान करावं असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचं दौंड तालुक्यातील विविध गावात उत्साहात स्वागत होत आहे.