हे मात्र खरं....लग्न समारंभामध्ये लोकसभा निवडणुक हीच चर्चा रंगतेय...
फोटो ओळ-ग्रुप फोटो घेताना मात्र एकत्र सर्वपक्षीय उमेदवार कार्यकर्ते
सोमेश्वरनगर - खरंतर लग्न समारंभ म्हणला की येणारे पै पाहुणे किंवा मित्रमंडळी यांचे एकच चर्चा असायची नवरा मुलगा काय करतो... नवरी मुलगी काय करते कुटुंब कसे आहे अशा विविध विषयांवर लग्नाची अक्षदा पडेपर्यंत किंवा जेवण होईपर्यंत चर्चा चालायच्या परंतु आता सध्या लोकसभा निवडणूक सर्वत्र सुरु झाल्या आहे सर्व पक्ष दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार भेटी तसेच दौरा अशा पद्धतीत आपला प्रचार चालू आहे असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा निवडणूक रिंगणात असल्याने मतदारसंघांमध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापलेली दिसत आहे सद्या लग्न तिथी असल्याने या समारंभामध्ये फक्त लोकसभा निवडणूक विषयी चर्चा होताना दिसत असल्याचे दिसत आहे असे बोलताना अनेक जेष्ठ मंडळींनी बोलताना सांगितले.