बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात
बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातील घोटावडे येथे रविवार दि २१ रोजी प्रचाराला सुरुवात झाली.या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी साऱ्या परिसरातून "घड्याळ" ला लाख मताधिक्य मिळून महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच रमेश नाना शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, राजाभाऊ हगवणे, राजाभाऊ चांदेरे, हिंदू युवा प्रबोधिनीचे संस्थापक राजाभाऊ बेंद्रे, विश्वास कळमकर, किरण शेळके, विठ्ठल गोडांबे, दत्तात्रय दाभाडे, राजाभाऊ चांदेरे, अनंतराव घोगरे, निकिता घोगरे, शंकर शेळके, चिंतामण तापकीर, तात्यासाहेब देवकर, अंकुश गोडांबे, योगेश शेळके यांच्यासह परिसरातील विविध गावचे आजी माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी हिंदू युवा प्रबोधिनीच्या वतीने महायुतीला पाठिंबा देण्यात आला. त्यांच्यासह शेळके कुटुंबीयांनी केलेल्या स्वागत सन्मानाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले