निंबुत येथील उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारयांची सदिच्छा भेट.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील निंबुत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निंबुत गावचे माजी सरपंच उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी जात सदिच्छा भेट दिली, उदयसिंह काकडे हे निंबुत गावचे सामाजिककार्यकर्ते असून त्यांनी आपल्या सरपंचकीच्या कालावधीत भरीव काम केले आहे. तसेच त्यांची निंबुत व परिसरात सर्वसामान्य नागरिक व युवकांचे संघटन चांगले आहे, काकडे यांच्या घरी अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुळामथ्ये विविध चर्चेला उधान आले आहे. तीन भावांचे एकत्रित कुटुंबाचे आदराने विचारपूस करत कौतुकाची थाप मारली स्वसामान्य कार्यकत्य्याच्या घरी भेट दिल्यामुळे ठीकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे. यावेळी निंबुत परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींनी हजरी लावली यामध्ये श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, मा. चेअरमन शहाजीराव काकडे, विजयराव काकडे, गौतम काकडे, विराज काकडे, राजेंद्र काकडे, रमाकांत गायकवाड , विक्रम भोसले सह बहसंख्य कार्यकर्तें उपस्थित होते.
शेती व्यवसाय करणाऱ्या उदयसिंह काकडे या कार्यकत्याचा एकत्रित कुटुंबातील बंगला पाहून अजित दादांनी सर्व कुटुंबाचे कौतुक केले.