बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या व्यापार व उद्योग सेलच्या उपाध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची निवड.
सोमेश्वरनगर - युवा उद्योजक निलेश दिलीप गायकवाड यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या व्यापार व उद्योग सेलच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने या निवडीचे पत्र कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रोहित पवार व पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जगताप अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बारामती तालुका (औद्योगिक सेल) यांच्या शुभहस्ते या निवडीचे पत्र देण्यात आले.
माजी खासदार शरदचंद्रजी पवार व महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरीव कार्य करून पक्ष संघटना उभी करून पक्षाचे कार्य सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत या निवडीनंतर निलेश गायकवाड यांनी व्यक्त केले.