मुख्य संपादक-विनोद गोलांडे
उपळाई ठोंगे(प्रतिनिधी):बार्शी तालुक्यातील उपळाई ठोगे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार,दिनांक २७ मार्च २०२७ रोजी बार्शी शहर,उपळाई ठो. व खांडवी येथील कुलवंत वाणी समाजबांधव व भगिनीं यांनी एकत्रित येत संत तुकाराम महाराज बीज भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली . यंदाचे बीज सोहळ्याचे त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी ३७५ वर्ष आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन झाले अशी अख्यायिका आहे. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. उपळाई ठो. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराज व वारकरी यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दुपारी १२ पर्यंत भजन,किर्तन या माध्यमातून तुकोबारायांच्या नामाचा,विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. यानंतर दुपारी १२ वाजता उपस्थित भाविकांनी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर फुलांची उधळण करत मनोभावे हात जोडून विनम्र अभिवादन केले. यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या सोहळ्याचे एकत्रित येऊन उत्कृष्ठरित्या आयोजन केल्याबद्दल उपळाई ठो.,बार्शी व खांडवी येथील सर्व समाजबांधव व भगिनी यांचे, कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक यांच्या वतीने विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करून व मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या.