सोमेश्वर हायस्कूल मध्ये सन 1994/95 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर हायस्कूल मध्ये सन 1994/95 बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला ....विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वावर सर्वच माजी विद्यार्थी कार्यरत आहेत त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक तसेच डॉक्टर ,वकील,इंजिनिअर,आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, सहकारी संस्था ,इंडस्ट्री ,पोलीस दल ,शेती, व्यवसाय अशा विविध क्षेत्रात आपला मानाचा ठसा उमटवत या बॅचचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत व मुली विवाहानंतर सासरी विविध जिल्ह्यातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते... तसेच सकाळीच आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे घेतले त्या सोमेश्वर हायस्कुल मध्ये मित्र मैत्रिणी एकत्र आल्या,,, ज्या वर्गात शिकत होतो त्या वर्गात बाकड्यावर बसत एक दिवस का होईना शाळेचा अनुभव अनुभवायला मिळाला त्यामुळे आलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच प्रत्येकांने आपापल्या मनोगत मध्ये सध्या काय करतो किंव्हा करते या विषयी चर्चा झाली ...काही वर्षा वर्षांपूर्वी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यानिमित्त सोमेश्वर हायस्कुल मधील शिकत असलेल्या मुलांना पिण्याचा पाण्याचा आरो फिल्टर देण्यात आला होता त्यामुळे सोमेश्वर कारखाना तसेच पंचक्रोशीतून विविध उपक्रम राबवत असल्याने परिसरातून या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे... सर्व आलेले माझे विद्यार्थी एकत्र येत प्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिर येथे स्वयंभू शिवलिंग दर्शन घेतले तसेच जेवणाचा आस्वाद घेऊन या स्नेह मेळाव्याची सांगता झाली.