एक अत्यंत अस्वस्थ करणारा माहिती पट
Too Much Democracy दिग्दर्शक वरुण सुखराज
रविवार १७ मार्च सायंकाळी ७ वाजता तुळशी कट्टा वाघळवाडी
सोमेश्वरनगर - आपण शेतकरी असू किंवा नसू, आपल्याला शेतकरी आंदोलनांचे मुद्दे माहिती असतील किंवा नसतील, ते मान्य असतील किंवा नसतील, शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा हक्क आहे हे तर आपण मान्य करतो का? त्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हणणे, तिथे लष्कर आणून त्यांना मारुन टाका म्हणणे कितपत मानवी आहे? त्यांच्या मोर्चात गाडी घालून लोकांना मारण्याचा प्रयत्न करणे किती योग्य आहे?
यावेळी आपण आपल्या तुळशी कट्ट्यावर घेऊन येतोय एक अत्यंत अस्वस्थ करणारा माहिती पट
Too Much Democracy
दिग्दर्शक वरुण सुखराज
तुळशी कट्टा क्रमांक २३
दिनांक १७ मार्च,२०२४
सायंकाळी ७ वाजता
जागा - सुकून, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे
कृपया नोंद घ्या, हा माहितीपट दीड तासाचा असल्याने आणि त्यानंतर आपण वरुण सुखराज यांचेसोबत चर्चा ही करणार आहोत.
तेव्हा आपण बरोबर सात वाजता कार्यक्रम सुरु करणार आहोत. कृपया वेळेत या.