"महाशिवरात्रीनिमित्त "श्री सोमेश्वर शिवलिंग चे विविध जिल्ह्यातील शिवभक्तांनी घेतले दर्शन
सोमेश्वरनगर - श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे (ता. बारामती) येथील प्रतिसोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर येथे शुक्रवार(दि.०८ ) महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू सोमेश्वराच्या शिवलिंग दर्शनासाठी विविध जिल्ह्यातील भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती,महाशिवरात्री निमित्त सोमेश्वर मंदिरात अति महारुद्र अनुष्ठान होते श्री सोमेश्वर साखर कारखाना दरवर्षी प्रमाणे आयोजन करत असते , दिवसभर शिवभक्तांना उपवासाची खिचडी, केळी, राजगिरा चक्की चे आयोजन शिवभक्तांनी केले होते तसेच उन्हापासून शिवदर्शन भक्तांना सुरक्षेसाठी कापडी मंडप तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त केला होता, मंदिर व मंदिर परिसरात विविध मिठाईवाडे खेळणी वाले तसेच गृह उपयोगी वस्तूंचे स्टॉल लागले होते तसेच लहान मुलांना खेळण्याचे विविध पाळणेही आले होते त्यामुळे मंदिर व मंदिर परिसर गजबज होऊन गेला होता.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेंद्र फणसे,करंजेपूल दुरक्षेत्र पी एस आय पांडुरंग कन्हेरे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता तसेच मंदिर परिसरात होळ आरोग्य केंद्र मार्फत बारामती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांच्या सूचनेनुसार आरोग्य कर्मचारी यांनी मोफत आरोग्य सेवा बजावली.
महाशिवरात्री निमित्त लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेत शिवभक्त व महिलांसोबत सेल्फी फोटो चा आनंद घेत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवलिंग वर बेल फुल वाहत सांगता होत असते या अनुषंगाने भाविकांनी रात्री रांगेमध्ये उभा राहत हर हर महादेव च्या गजरात दर्शनाचा लाभ घेतला अशी माहिती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली.