सुपा पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा निवडणूक तसेच सण उत्सव अनुषंगाने पथसंचलन
बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत आगामी येणारे सण उत्सव व लोकसभा निवडणूक अनुषंगाने CISF व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्तपणे आज दि 11/03/24 रोजी मोरगांव व सुपा या गावात पथसंचलन घेण्यात आले. सदर पथसंचलन मध्ये 02 पोलीस अधिकारी, 25 पोलीस अंमलदार, 02 CISF अधिकारी व 38 CISF जवान, 04 होमगार्ड असे सहभागी झाले होते.
१.सुपे पथसंचलन मार्ग :- डायमंड चौक -बस स्टॅन्ड- बाजार पेठ- हनुमान मंदिर- माळआळी- पोलीस स्टेशन
२. मोरगाव पथसंंचलन मार्ग:-मोरगाव चौक- कोहिनूर चौक- मयुरेश्वर विद्यालय -ग्रामपंचायत कार्यालय मयुरेश्वर मंदिर परिसर -मोरगाव चौक