स्तुत्य उपक्रम ! "सती मालुबाई" येथे समृध्दी स्वयंसहाय्यता महिला बचत गटामार्फत भाविकांना फराळ वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील जोशीवाडी करंजे येथील समृद्धी स्वयं सहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी "सती मालुबाई मंदिर" येथे महाशिवरात्री शुक्रवारी(दि ८ ) निमित्त दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांना फराळ फळे वाटप केली.
या प्रसंगी करंजे ग्रामपंचायत सरपंच भाउसो हुंबरे , सदस्य विष्णू दगडे हे उपस्थित होते. मालुबाई मंदिराचा जीर्णोद्धार चालू असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे सती मालूबाई मंदिर येथे सध्या भाविकांची गर्दी वाढत आहे.या अनुषंगाने जोशीवाडी येथील समृद्धी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सोनाली धूर्वे सचिव स्वाती जोशी ,नंदा फरांदे,मंगल फरांदे,मुक्ता फरांदे, चंदा जोशी,गौरी जोशी,ललिता फरांदे ,जयश्री फरांदे आणि निकिता जोशी यांनी फराळ वाटप केले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.