बारामती: येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत सक्रीय कार्यकर्ते तसेच जिल्हा दक्षता समितीचे अभ्यासू सदस्य साधु रावसाहेब बल्लाळ यांची राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
सदरचे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसेच पुणे जिल्हा अध्यक्ष पै.सचिन घोटकुले यांनी दिले.
साधु बल्लाळ यांचा असणारा पक्षात सक्रीय सहभाग व पक्ष तळागळात पोहचविण्यासाठी केलेली त्यांनी धडपड या सर्व बाबींचा विचार करीत त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश जगताप यांनी पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
निवडी प्रसंगी साधु बल्लाळ म्हणाले की, पक्षाचा व युवक संघटनेचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडला व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागळात पोहचविण्याचे काम करेन असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.पंचायत समितीचे माजी सभापती करण भैय्या खलाटे बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप मदन नाना देवकाते मान्यवर उपस्थित होते