श्री सोमेश्वर वाचनालयाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
श्री सोमेश्वर वाचनालयाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली ही सभा
गुरुवार दि २८ रोजी श्री सोमेश्वर वाचनालयाची सन- २०२३/२४ ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते .सभेची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली सभेच्या अध्यक्षस्थानी प्र. अध्यक्ष अनिलराव निगडे हे होते सभेचे स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे कोषाध्यक्ष प्रा .डॉ. एस .पी .जाधव यांनी केले तसेच सभेची सूचना वाचन कार्यवाह उदयसिंह जगताप यांनी केले व वाचनालयाचे अं. हि .तपासणीस डॉ .प्रा. अजय दरेकर यांनी वार्षिक अहवाल व जमा खर्च याचे वाचन केले तसेच सन -२०२३/२४ चे अंदाजपत्रक वाचन श्री अनिल निगडे यांनी केले
व सन -२०२२/२३ च्या अहवाल वृतांतास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सन २०२४/२४ च्या अजेंठा वरील सर्व विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले त्यामध्ये मु.सा
काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वायदंडे सर यांनी सर्व आजीव सदस्यांनी आपल्या जन्मदिनी वाचनालयासाठी प्रत्येकी पाच पुस्तके भेट देण्यात यावीत तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी अपुरीअसणारी बैठक व्यवस्था वाढवावी, तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन असा स्तुत्य उपक्रम राबवावा म्हणजे पंचक्रोशीतील विद्यार्थी वर्ग व वाचक वर्ग यांना नव्याने पुस्तक वाचावयास मिळतील व वाचनालायचा ग्रंथ संग्रह वाढण्यास मदत होईल यासाठी सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली . त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ऑफिस सुप्रिडेंट श्री सतीश लकडे सर यांनी सर्व अजीव सदस्यांना आवाहन केले की आपली सोमेश्वर वाचनालयाची मासिक वर्गणी ५० रु. आहे ती १ एप्रिल २०२४ पासून १०० रु. करण्यात यावी तसेच वाचनालयासाठी प्रत्येकाने तीन सभासद नव्याने द्यावीत म्हणजे आपल्या वाचनालयाचे ५०० सभासद संख्या होण्यास मदत होईल असे आवाहन केले त्यास उपस्थित सर्व आजीव सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कार्यकारी मंडळाचे सदस्य व सर्व आजीव सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते . सभेचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र होळकर उपकार्यवाह यांनी केले तसेच सभेचे आयोजन सहा.ग्रंथपाल जितेंद्र जगताप यांनी केले व आभार प्रदर्शन वाचनालयाचे अं.हि.तपासणीस अनिल भोसले यांनी केले.