लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार अचानक भेटतात तेव्हा....
बारामती : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळोची येथील काळेश्वर मंदिरात सौ. सुनेत्रा पवार यांनी समोरून आलेल्या नणंद आणि लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांचे गळाभेट देऊन स्वागत केले. यावेळी नणंद भावजयीने परस्परांना शुभेच्छाही दिल्या.
याबाबत अधिक वृत्त असे, की सौ. सुनेत्रा पवार या आज दिवसभर विविध शिव मंदिरात दर्शनासाठी भेटी देत होत्या. या दरम्यान, संध्याकाळी त्या जळोची येथील शिवमंदिरात दर्शनासाठी आल्या. दर्शन घेऊन सौ. सुनेत्रा पवार गाभाऱ्यातून बाहेर पडत असताना समोरून खा. सुप्रिया सुळे आल्या. यावेळी दोघींनी परस्परांशी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली. परस्पराना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मोठ्या आनंदाने सौ. सुनेत्रा पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निरोप दिला.
खा. सुप्रिया सुळे दर्शन घेऊन गेल्यावर देखील सौ. पवार बराच वेळ तिथेच लोकांच्या गरड्यात लोकांचा फोटोचा, चिमुरड्यांना व विशेषत: तरुणींचा सेल्फीचा हट्ट पुरवत होत्या.
या भेटीची व त्यातील उमदेपणाची चर्चा रंगली आहे