सोमेश्वरनगर ! सुप्रियाताई सुळे यांची भव्य मुरवणूक; ढोल ताशा व फटाक्यांच्या गजरात केले स्वागत...
सोमेश्वर येथील महिला-युवा कार्यकर्त्यांचा भव्य उस्फुर्त प्रतिसाद
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे सुप्रियाताई सुळे यांची यांची भव्य मिरवणूक ओपन जीब मधून काढत ढोल ताशा व फटाक्यांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सर्वच महिला तसेच युवा कार्यकर्त्यांनी स्वागत केले यावेळी व्यापार व उद्योग सेल अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद प्रमुख गट पप्रमुख ज्येष्ठ नेते राजेंद्रबापू जगताप ,बारामती तालुका उपाध्यक्ष प्रदीप शेंडकर, सरचिटणीस सागर मदने ,चिटणीस प्रदीप कणसे ,बारामती अल्पसंख्या सेलचे पदाधिकारी अमर पठाण करंजे, चौधरवाडी चे ज्येष्ठ चारुदत्त शिंदे,मगरवाडी चे हनुमंत मगर,वसंतराव जगदाळे ,सोमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड, सुधीर गायकवाड ,दादू मांगडे ,किरण गायकवाड ,महिला युवती बारामती तालुका अध्यक्ष प्रियंका शेंडकर ,महिला सरचिटणीस सोनाली गायकवाड, कार्याध्यक्ष नुसरत इनामदार, उद्योजिका गाडगे ताई
यांच्या समवेत इतर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सुप्रियाताई यांची मिरवणूक सोमेश्वर मुख्य चौक येथून ओपन जिम मधून मोठ्या जल्लोषात काढण्यात आली तसेच सोमेश्वर नगर येथील नव्याने सुरू होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार संपर्क कार्यालय चे उद्घाटनही सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी महिला व युवक वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याने सुप्रिया सुळे यांनी असाच उत्स्फूर्त प्रतिसाद बरोबर राहावा व भविष्यातील विविध कामे जोमाने करावी असेही त्यांनी बोलताना कार्यकर्त्यांना सांगितले