म्हणून शिवभक्त महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतात
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा !!
वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा !!
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय श्रीशंकरा !!
!!आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा!!
भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्त महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतात
वर्षभर येणार्या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे.महाशिवरात्रीच्या सणाचे महत्त्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता